Saturday, 8 March 2014

स्त्री

         आज महिला दिन म्हणून थोड स्त्री ह्या विषयावर लिहायची ईच्छा झाली. स्त्री ही एक शक्ती आहे.आजची स्त्री आपल्याला सगळ्या क्षेत्रात पुढे दिसते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. अगदी क्रिडा,राजकारण,पायलट, मोटरमन, IPS,IAS अधिकारी ह्यात आधी पुरुषांच राज्य होत पण ह्या सर्व गोष्टी स्त्रीया आता सहज करु लागल्या. स्त्रीयांना ५०% आरक्षण मिळू लागल. पण ह्या देशात ४ पद्धतीची लोकं राहतात.
          ह्यात महिलांना स्वातंत्र्य देणारे, सनातन पुरोगामी विचारांचे,बायका म्हणजे चूल मुल ह्या विचारांचे आणि स्त्री म्हणजे लैंगिक दृष्ट्या आकर्षण असणारे आहेत.मुख्य म्हणजे सनातन पुरोगामी विचारांचे लोक अजूनही ह्या देशात आहेत याच दुःख आहे मुख्य म्हणजे गरीब श्रीमंत अडाणी शिकलेले सर्वच गटात त्यांचा सामावेश आहे. हे लोक स्त्रीयांचा खुप छळ करतात मुलगाच झाला पाहिजे अशी अट. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा पुढे जाऊन खानदान चालवणार आणि स्त्री म्हणजे फक्त आणि फक्त खर्च ह्या विचारांचे लोक आहेत. त्यामूळे स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण अलिकडे खुप वाढले होते. अभ्रक मारण हा प्रकार कधी कधी स्त्रीच्या विचारा विरुद्ध होत तर कधी तीच्या संमतीने..किती अन्याय आहे त्या चिमुकल्या छोट्याश्या जीवावर ते काही बोलू शकत नाही विरोध करु शकत नाही अश्या निष्पाप जीवांना मारुन टाकायच.बर मारणार्या डॉक्टरांनाही त्याच काही वाटत नाही अक्षरशः हे डॉक्टर कुत्रे पाळता अभ्रक मारायला पुरावे नष्ट करायला पैसे मिळतात डॉक्टर खुश..गरज आहे कडक कायद्यांची..आजची स्त्रीही नोकरी करुन पैसे मिळवू शकते आणि आणि घरच्यांचा सांभाळही करु शकते मग मुलाचा आग्रह का? उलट काही मुलच आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकत आहेत.. so विचार बदला आता मुलगा म्हणजे सर्वस्व अस नाही.
             स्त्री म्हणजे चुल आणि मुल असा विचार करणारेही आहेत पण सध्या परिस्थिती बदलली पाहिजे किंवा बदलते आहे मुलगी शिकली प्रगती झाली हा नुसता नाराच न राहता मुलींना शिक्षण मिळण्याच प्रमाण वाढल आहे मुलगी शिकवून काय करणार? ती तर सासरी जाणार हे विचार बदलले गेले पाहिजेत. आज कितीतरी स्त्रीयांमुळे देशाच नाव पुढे आहे. मुलींची कष्टाळू मनापासून काम करण्याची वृत्ती जास्त वृत्ती जास्त असते मुलांपेक्षा.. आजपर्यंत दहावी बारावीच्या परिक्षेत जास्त गुण मिळवणार्या ही मुलीच आहेत so मुलींना शिकवण खुप गरजेच आहे.
             आजकाल आपण बातम्यांमध्ये पेपरमध्ये सतत एकतो वाचतो ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार ९३ वर्षाच्या बाईवर बलात्कार हे सगळ का होतय कश्यामुळे होतय? ह्यात त्या निष्पाप स्त्रियांची काय चुक? का आपल्या देशात स्त्रिया सुरक्षित का राहु शकत नाहीत? गरज आहे पुरुषांनी स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याचा आणि शरीरातील वासना कमी करण्याचा.. आणि तरीही जर असं कृत्य होत राहिली तर गरज आहे कडक कायदे करण्याची.. आज एखाद्या स्त्रीवर acid फेकल जात १० वर्षात acid फेकणारा तरुण तुरुंगातुन बाहेर येतो पण आयुष्यभरासाठी त्या मुलीचा चेहरा विदृप होऊन जातो.. मग गुन्हा कोणाचा शिक्षा कोणाला? परवा सत्यमेव जयतेमध्ये सांगितल त्यानुसार अजुन १,०१,०४१ बलात्काराचे गुन्ह्यांची सुनावणी होण बाकी आहे गुन्हेगार बिंधास्त आहे मग का असे गुन्हे परत होणार नाहीत गरज आहे हे खटले fastrackमध्ये काढायची लोकांनी जाग होऊन आंदोलन करायची.निर्भया बलात्काराच्या वेळी सगळ्यांनी निदर्शन केली होती facebook twitterवर काळे ठिपके लावून निंदा केली मेणबत्या जाळल्या मग नंतर काय? त्याने बलात्कार थांबले? गरज आहे कायद्यात सशक्त बदल होण्याची आणि ते झाल तरच महिलांची सुरक्षा व्यवस्थित होण्यास मदत होवू शकते.. आज महिला दिवस आहे hope अस काहीतरी चांगल होईल.
   महिला दिनाच्या दिवशी वाचलेली चांगली लाईन आठवली..
      यात्र नार्यस्तू पुज्यंते रमते तत्र देवता