काल अचानक कॉल आला 'दादा में मंदा बोल रही हूँ' माझ्या लक्षातच नाही आल कोण मंदा आणि काय ते.. परत आवाज आला 'वो धंदेवाली जिनके लड़कों को मदत चाहिये था'.. मग लक्षात आल काही दिवसापूर्वी वेश्यांच्या मुलांसाठी मदत करायच ठरवल होत आणि मदत घेण्यासाठी कॉल आला आहे. 'अभी मेरा accident हो गया है so बादमे १० दिन बाद ठीक हो जाऊँगा तब में खुद सब बच्चोंके पढाई का सामान लेके आता हूँ' बोलून फोन ठेवला..२ तासांनी door bell वाजली कोणीतरी बघायला आल असेल अस वाटल तर १० ते १४ वर्षाची ९ मुल होती गरीबाचीच मुल वाटत होती. 'दादा आपको कहाँ लगा है' हा पहिला प्रश्न होता. विचारल्यावर मग समजल त्यातला एक मंदाचा मुलगा होता. सर्वांना आत बोलावल सर्व आत येऊन बसले. सर्वांनी एक फूल हातात दिल आणि शेवटी एक पेरु हातात ठेवला 'हमलोग ने २०रुपया जमा किया और लेके आया'अस ते सांगत होते आणि literally मला रडायला येत होत, ती एका वेश्याची मुल होती तरी त्यांच्यावरील झालेले संस्कार बघून खुपच भारावून गेलो.
नंतर मुल match बघत बसली खायला दिल आणि मुल निघून गेली पण माझ्या डोक्यात ते विचार चालूच होते. एक वेश्या जीची मुल शिकू ईच्छितात आई शिकवू ईच्छिते त्यांच्यासाठी आपण काहीतरी केल पाहीजे नुसत पुस्तक आपण देतच आहोत पण आपण free असताना त्यांना शिकवल पाहीजे अजून चांगले संस्कार झाले पाहीजेत अस काहीतरी केल पाहीजे आणि जर आई ईच्छूक असेल तर आपण तीला ह्या दलदलीतून बाहेर काढल पाहीजे..आणि समाज स्विकारेल अशी काम दिली पाहीजेत भलेही ती धुण्या भांड्याची असोत पण तीला सन्मानाने जगता आल पाहीजे.
ती मुल आली पण खर्या अर्थाने डोळे ऊघडून गेली आपण नुसते आपल्या समस्याना घेऊन बसलो असतो आपल्याला सर्व मिळत म्हणून जाणीव राहत नाही.. आता खरी जाणीव झाली मी मंदा आणि तीच्या friendsना ह्या धंद्यात कसे घुसलात वैगरे विचारुन बाहेर काढण्याचा आणि पुनर्वसन करण्याचा नक्की प्रयत्न करेन.. Hope आधी लवकर ठीक होईन😅😊