भगतसिंह, सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस ह्यांनी देशासाठी प्राण पणाला लावले. त्यांच्यासाठी लोकही प्राण देण्यास तयार असायची. पण आता लोकांवर प्रेम फक्त मतदानाच्या वेळेस दिसून येत हे मेलेल्या माणसाच्या टाळूवरच लोणी खाण्यासही कमी पडणार नाहीत हे राजकारणी. शेतकर्यांवर तर भारीच प्रेम दिसून येत. सिंचन घोटाळा, चारा घोटाळा, दुष्काळ पडला की तर मजाच मोठ्या मोठ्या रकमेच्या घोषणा करायच्या कुठे जातात ते पैसे कोणालाच समजत नाही. आधीच्या नेत्यांची साधी राहणी आणि उच्च विचारसरणी होती आत्ता आहेत त्यांची फक्त खाणी पिणी आणि उच्च राहणी,उच्च विचारसरणी राहुदेत पण विचारसरणी आणि त्यांचा काही संबंधच नाही. कोळसा घोटाळा, 2G घोटाळा, WAKF board land घोटाळा हे काही लाख करोडमधले घोटाळे आहेत तर सिंचन, चारा, कॉमनवेल्थ, भुजबळांचा हे काही हजार करोडमधले घोटाळे. सामान्याला हजार, लाख गोळा करण मुश्किल आणि हे नेते हजारो लाखो करोडोंचे घोटाळे करतात. ऐवढ्या पैशाच करणार काय? वरती जाताना तर नागडेच जाणार.
अगदी नगरसेवकापासून ते मोठ्या नेत्यांचा सर्व पैसा बाहेर काढला आणि अभिनेते उद्योगपती ह्यांची व्यवस्थित करवसुली केली तर भारतावरच कर्ज संपेल एवढ निश्चित. निवडून आल की ५ वर्षांनी ह्यांची संपत्ती ३ ते ५ टक्यांनी वाढलेली असते.असे काय उद्योग असतात? सामान्याला तर सांगा तो करोडो नाही पण लाख तरी कमवेल. सरकारी उद्योग contract baseवर करायचे ती सर्व contract आपल्या घश्यात घालून करोडो रुपये कमवायचे,त्यातही भ्रष्टाचार करुन पुन्हा करोडो रुपये कमवायचे. हे ह्यांचे धंदे.
भुजबळांची २५५६ करोडची प्रॉपर्टी?? अहो त्यातले ५००करोड जरी तुमच्याकडे ठेवले असतेत आणि २०००करोड दुष्काळग्रस्त भागात वापरले असते किंवा गरीबांच्या मुलांना शिकवल असत पण हे का नाही आल डोक्यात? अहो शेतकर्यांच्या गरीबांच्या दुवा मिळाल्या असत्या त्या कितीतरी करोडोंपेक्षा अधिक आहेत. इलेक्शनला जो अमाप पैसा ओतता तो ओतायला लागला नसता लोकांनी हक्काने मदत केली असती आमचा नेता म्हणून.
सर्वच नेते असे नाहीत पण काही नेत्यामुळे तेही बदनाम होतात. सुशिक्षित वर्गाला अश्या लोकांमुळे राजकारणात जायला रसच उरला नाही. जीवनात सर्व सुख उपभोगायला हवीत आपण सर्व गांधिजींसारख नाही होवू शकत ते महान होते पण सुखाची व्याख्या ठरवूनच जगायला हव. आपल्याला किती हव आणि किती आहे ह्याचा विचार करायला हवा. गरीब गार लादीवर जरी झोपत असला तरी त्याला झोप येत असेल पण भुजबळांना नाही. So तुम्ही ठरवा तुम्हाला भुजबळ व्हायचय की मनाने श्रीमंत माणूस व्हायचय. पैसा कसाही कितीही कमवता येतो पण कसा कमवलाय ह्याला महत्व आहे.