दहीहंडीतल marketing
दहीहंडी भारतातला प्रसिद्ध उत्सव आधी ४ ते ५ थर लावून उत्सवाचा आनंद घेत असत पण आता मात्र चित्र खुप बदललेल दिसत उत्सवाचा पारंपरिक पणा नाहीसा झाला ते वरती चढून मलाई खाण्याची जागा पैशानी घेतली कृष्ण मलाई खायला दहीहंडी करायचा आता स्पर्धा आणि पैशासाठी ९ ते १० थर लावतात त्यात कितीतरी जणांचे हातपाय अधू होतात काही जणांचे जीव जातात. पारंपरिक नृत्याची जागा चिकनी चमेली मुन्नी शिला ने घेतली तेही चालेल पण त्याचा आवाज मर्यादित ठेवायला हवा सण म्हणजे त्यात पवित्रता मांगल्यता वाटली पाहिजे ते नाहीस झाल.
त्यात आपले राजकीय नेते आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी लाखोंच्या हंड्या लावतात कर्कश्श music अनेक कलाकार बोलावतात glamour वाढवतात पण पथकाना खरोखर दाखवतात तेवढे पैसे भेटतात अस नाही त्यानाही हे राजकारणी डांबवतात आणि पाण्याचा अपव्यय तर आहेच.
आता दहीहंडी हा खेळ म्हणून बघत आहेत पण त्यासाठी कोणी safety precaution घेतली आहे? गोविंदा चा विचार कोणी करतच नाही सगळे आपला पक्ष कसा पुढे जाईल हे बघतात आणि गोविंदा त्यांच्या कचाट्यात सापडतात म्हणून म्हणतो सगळ्याच बाजारीकरण झालय.
No comments:
Post a Comment