Sunday, 6 July 2014

मुंबई आणि मुंबईकर

   मराठी माझी मायबोली लोकांनी परदेशी नेली सार्यांनी दिला तीला मान अवघ्या महाराष्ट्राची शान संस्कृतीचा मेळ भरतो नाही जीथे दुजाभाव बनतो भाषांचा इंद्रधनू अस माझ गिरगाव
           हे गाण आज अचानक play listला लागल आणि blog लिहावासा वाटला..मुंबईकर म्हटल की गिरगाव,परेल,लालबाग,दादर हे भाग लक्षात येतात जीथे खुप सार्या कापड गिरण्या होत्या तीथे आपला सामान्य मध्यम वर्गीय मराठी माणूस स्थायिक झाला, मोठा झाला.
           मनाने साधा, स्वच्छ मनाचा, पण तेवढाच कणखर एक मारली तर दोन ठेवून देणारा मराठी माणूस, तेवढाच संस्कृतीचा अभिमान, गर्व असलेला हा मराठी माणूस खिश्यात दमडी नसू दे पण सण साजरा करणारच..सांगायला अतिशय आनंद होतो मुंबईतले साजरे होणारे उत्सव बघायला लोक परदेशाहून येतात. गणपती, दहीहंडी, गुढीपाडवा हे सण साजरा करण्यात गिरगाव,परेल,लालबाग,दादरकरांचा हातच कोण धरु शकत नाही. एवढ ऐक्य एवढा जोश अस सगळ्याच जबरदस्त combination मुंबईकरात आहे. आज जरी सगळीकडे बोंब आहे मराठी माणूस मुंबईत खुप कमी दिसतोय तरीही आज तेवढ्याच जोमाने गुढीपाडव्याची प्रभात फेरी निघते, तेवढ्याच जोशात बाप्पा येतात.पण सत्य परिस्थिती मुंबईतली लोक ठाणे, डोंबिवलीत जात आहेत अशी असली तरीही तिकडेही हे ऊत्सव जोशात सुरु आहेत. त्यासाठी मुंबईकराला सलाम
            आज गिरगाव,परेल,लालबाग,दादर भागात मोठे मोठे tower ऊभे राहत आहेत किंमत चार करोड, पाच करोड पण एक मात्र नक्की आहे तीथे राहणारा माणूस पैशासाठी जगतोय आणि सामान्य 10X10च्या खोलीत राहणारा माणूस माणूसकी साठी जगतोय ह्याचा खरच आम्हाला अभिमान आहे. रात्री अपरात्री कोणीही आजारी पडू दे कोणावरही प्रसंग येवू दे अख्खी चाळ जागी असते तस कुठल्याच buildingमध्ये नाही दिसणार, आणि मराठी माणसाकडे पैसे नसले तरी प्रामाणिकपणा कधीच सोडणार नाही.
           पुढे बाहेरच्या राज्यातून धनाढ्य लोक मुंबईत आले. मुंबईत त्यांचा व्यापार तेजीत चालू लागला. त्याचे मोठे offices, malls, high class buildings उभ्या राहिल्या पैसा गिरण्या चालवण्यात नाही buildings बांधण्यात आहे हे लक्षात आल आणि मुंबईतल्या गिरण्या बंद पडल्या.बहुतेक मुंबईकर हा कामगार वर्गातला मुंबईतल्या गिरण्या बंद पडल्या खिश्यात पैसा नाही त्यामूळे जागा विकून बहुतेक मुंबईकर गावात गेले, काही ठाणे,डोंबिवली,कल्याण,बदलापूर अश्या ठिकाणी गेले. हळूहळू मुंबईकरांना मुंबई न परवडणारी झाली त्यांच्या चाळींच्या मोठ्या buildings झाल मुंबईकराला maintenance परवडणारा नव्हता so जागा विकून बाहेरगावी गेले. पण जेवढे शिल्लक आहेत ते ही संस्कृती जपत आहेत.
             मुंबईत अनेक परप्रांतीय आले आपले धंदे बसवले मुंबईकराने त्यांनाही सांभाळल त्यांनाही मोठ केल. तेही आदराने बोलतात 'मुंबई में जाओगे तो भूखा नही सोओगे' मुंबई कष्ट करणार्याची आहे. कष्ट केलात तर पैसा आहे. सेकंदावर धावणारा मुंबईकर ट्रेनमध्ये चौथी सीट भेटली तरी खुश होतो. अश्या मुंबईकराला सलाम..:-)

No comments:

Post a Comment