काही दिवसांपूर्वी आम्ही फिरण्यासाठी दुसर्या शहरात गेलो होतो तर तिथल्या प्रसिद्ध मंदीरात जाणं आलच पण तिथे अस लक्षात आलं की पुजारीच पैसे घेऊन VIPलाईन करुन सोडत आहेत. साधी लाईन उगाच १ ते दिड तास अडवून ठेवायचे चालू होते. हे बघून दर्शन न घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. मी जेव्हा हा प्रकार ऐका मित्राला सांगितला तेव्हा त्याने मला विचारलं प्रश्न तु नास्तिक आहेस की काय? ऐवढ्या लांब फिरायला गेला पण त्या मंदीराचं दर्शन घेतलं नाही? तेव्हा खरं सांगायच तर मलाही प्रश्न पडला मी नक्की कोण आस्तिक की नास्तिक? आणि हा फरक कसा ओळखायचा? कारण खरं म्हणायच झालं तर मी गणपतीत गणपती बघायला जातो ते फक्त फोटोग्राफी करायला, प्राचीन मंदीरात जातो ते मंदीराची माहिती घ्यायला आणि कोरीव काम बघायला आणि तसही खुपच गर्दी असेल, धार्मिक ठिकाणी जीथे गैरप्रकार चालतात धक्के देऊन अकार्यक्षम कार्यकर्ते पुढे ढकलतात तिथे मी जाण्याच टाळतो मग मी त्यालाच प्रश्न केला मी आहे तरी कोण?? तो गमतीने बोलला देवळात जाणारा नास्तिक.
देवाला आपण शरीराने, मनाने, ज्ञानाने, बुद्धिने बघू शकत नाही अस धर्मग्रंथात लिहीलेल आहे मग आपण त्यांना मानायच का? खरतर आस्तिक आणि नास्तिक ह्या ऐकाच नाण्याच्या दोन बाजू आहे असं मी मानतो ऐक समाज अस मानतो की देवाचं अस्तित्व आहे तर दुसरा समाज मानतो की देवाचं अस्तित्व नाही. ऐखादा आस्तिक देवळात जातोय देवाची पुजा करतोय पण घरी आईवडीलांचा छळ करतोय तर तो नक्की कोण? जे मंदीरात लोकांना देवाच्या नावाने लुबाडतात, अंधश्रद्धा माजवतात ते आस्तिक कसे? आस्तिक असणं ह्याची व्याख्या काय? देवाची दिवसभर पुजा करणं? देवाचा जप करणं? की मोठंमोठ्या मौल्यवान वस्तू देवाजवळ ठेवणं?
मला कळलेल्या किंवा वाचलेल्या धर्मग्रंथानुसार आस्तिक ह्या शब्दाचा अर्थ आहे की जीवनाच्याप्रती सकारात्मक विचार ठेवा, स्वताच्या प्रगतीसाठी दुसर्याचा वाईट विचार करु नये, लोभ ठेवू नये आणि अन्यायापासून दूर राहणं. तर नास्तिक पणाचा अर्थ आहे स्वतामध्ये पाॅझिटिव्ह ऐनर्जी डेव्हलप करा, नास्तिक लोकांमध्ये देवाची भिती नसते तर वाईट गोष्टींपासून वाचण्यासाठी स्वताच्या मनावर स्वता ताबा ठेवा. कुठलेही भगवे किंवा मौलवींचे कपडे घालून कोणीही आस्तिक बनत नाही. आपले विचार, कृती, बोलण्यातला कृतज्ञ पणा जर साफ असेल तर आस्तिक काय आणि नास्तिक काय दोघाचही आयुष्य सुखकारक असतं.
मग पुन्हा मनात प्रश्न येतो धार्मिकता का महत्वाची आहे? संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील किंवा शिवाजी महाराज, लोकमान्य टिळक ह्यांनी धार्मिकतेचा अभ्यास का केला असेल? का टिळकांनी गीतारहस्य लिहिलं असेल? ह्याच उत्तर म्हणजे त्यातली शिकवण भग्वद् गीतेमधील शिकवण ही फक्त अर्जूनालाच उद्देशून न राहता ती आपल्या मागच्या पिढीला तसच आपल्या पिढीला व पिढ्यानपिढ्या पुढच्या पिढ्यांना शिकवणारी आहे. पावलान् पाऊल आपण कसे वागावे आपले आचरण विचार कसे आहे कसे असावेत हे त्यात सांगितलेलं आहे. सक्षम माणूस बनण्यासाठी जे गुण आवश्यक असतात ते त्यात सांगितलेल आहे. ह्यासाठी धार्मिकता सुद्धा आपल्या जीवनात खुप महत्वाची आहे. हिंदू तसच मुस्लिम आणि ख्रिस्ती धर्माची शिकवण अशीच आहे. कोणीही कुठलाही धर्म वाईट आणि आपला धर्म चांगला अशी शिकवण आपल्या धर्मग्रंथातून करत नाही परंतु लोकं धर्माच्या बाजाराबरोबरच दोन धर्मातील तेढ वाढवू लागले आहेत, आपला धर्म कसा वाढवता येईल हे बघू लागली आहेत ते संपूर्ण चूकीच आहे. मुळात काय तर माणूस आपल्या धर्माच्या शिकवणी विसरलाय, त्यामुळे काही जण मी नास्तिक म्हणून बिंधास्त मिरवू लागले आहेत, बाहेरच्या देशांमध्ये ज्या देशांना संस्कृती नाही असे देश भग्वद् गीतेचे धडे शाळा काॅलेजांमध्ये देत आहेत. का तर चांगला माणूस घडावा पण ईथे तर माणूस पाप करुन पाप धुण्यासाठी देवळात जातो पण त्याची चांगला माणूस बनण्याची ईच्छा नसते. त्यासाठी धार्मिक शिक्षणही शाळांमध्ये तेवढच महत्वाच आहे.
ॐ ह्या शब्दाच्या उच्चाराने देवाचा जप करतोय अस नाही तर आपली आपली भाषा शुद्ध होते मन एकाग्र होते. खुद्द आईन्स्टाईन बोलला होता मी नास्तिक नाही, विज्ञानशास्त्रातील बहुसंख्य लोकं समजतात की हे विज्ञान युग आहे ईथे देवाला महत्व नाही पण हे ते विसरता कामा नयेत की त्यांना अजून कोंबडी आणि की अंड ह्याचा शोध लागला नाही, दुसरा सुर्य बनवता आला नाही किंवा माणूस बनवून आत्मा टाकता आलेला नाही, ऐवढी सुसुत्रता आली कुठून? दिवसामागून रात्र होते रात्रीनंतर दिवस, पृथ्वी सुर्याभोवती फिरते ह्यात कधीच खंड पडत नाही. प्राण्यांची उत्तम साखळी बनवलेली आहे उंदराला साप खातो सापाला मुंगूस खातो मुंगूसाला पुढचे प्राणी खातात ह्यात कोणी ढवळाढवळ करत नाही म्हणजेच नैसर्गिक रचना किती उत्तम आहे ह्याचा अंदाज आपण लावू शकतो. पण ह्याच सगळ्यात संशोधनाच्या नावाखाली माणूस चंद्र मंगळ पोखरु लागलाय, नैसर्गिक साखळी तोडू लागलाय माणसाची भूक काही भागत नाही, ऐवढ्या सर्व ऐशोआरामाच्या वस्तूचा शोध लागून माणसाच आयुर्मान घटत चाललय.
महाभारत, रामायण हे जरी काल्पनिक वाटत असलं किंवा काल्पनिक असलं तरी त्यातून शिकण्यासारखं खुप आहे. हनुमान स्तोत्रात दिलेले सुर्याचे पृथ्वीपासूनचे अंतर हे आत्ता नासाने दिलेल्या अंतराईतकेच आहे. रावणाने सीतेला पुष्पक विमानातून उचलून नेलं, म्हणजेच विमानाचा शोध हा आधीपासूनच लागलेला असावा. तसच बॅटरीचा शोध हा अगस्त्य ऋषींनी लावला असेही पुरावे सापडलेले आहेत. तसेच ब्रम्हा विष्णू महेश हेच ईलेक्ट्राॅन, न्यूट्राॅन, प्रोटाॅन आहेत असही म्हटल जातं, हिंदू धर्म कधीही विज्ञानाला सोडून गेलेला नाही किंवा दुसर्या धर्माचा द्वेश कधी केलेला नाही. तसच बाकीच्या धर्मांनीही दुसर्या धर्मांचा द्वेश करा अस सांगितलेलं नाही. वैदिक गणिताला बाहेरच्या देशात अनन्य साधारण महत्व आहे त्यातही आपण साफ दुर्लक्ष करतो. काही गोष्टींचे आकलन हे बाहेरच्या देशांना
झालंय परंतु आपल्याला झालेल दिसत नाही. संस्कृत बोलून जसे उच्चार सुधारतात, मंत्र बोलून पाॅझिटिव्ह ऐनर्जी येते, मन ऐकाग्र होतं, योगा करुन शरीर तंदुरूस्त होतं लवचिकता येते पण आम्ही मात्र जीमला जातो.
खरतर धार्मिकता ही फक्त मूर्तीपूजेपुरती मर्यादित न राहता ती अभ्यासाचा विषय बनली पाहीजे. लहान मुलांना त्याच आकलन झालं पाहीजे नुसत्या आईन्स्टाईन, न्यूटनच्या गोष्टी न सांगता आपले आर्यभट्ट, व्यास किती महान होते तसच, तळपदेंनी लावलेला विमानाचा शोध हे ही अभ्यासात आलं पाहीजे. मंदीरात मुलांना परिक्षेच्या वेळेस पाया पडायला नेण्यापेक्षा हनुमान स्तोत्र, पसायदान, भग्वद् गीतेतील पाठ मुलांना शिकवल्यास मुलांच पाठांतरही झकास होईल आणि देवळात नवस बोलायला जायची गरजही लागणार नाही. पाॅझिटिव्ह ऐनर्जी सकारात्मकता ह्याचा अनुभव येईल. आता तुम्हीच विचार करा नास्तिक आणि आस्तिक कोणाला म्हणाल

No comments:
Post a Comment