आपण आज d.p बदलून बालदिवस साजरा केला पण मनापासून सांगा किती जणांना पटल? आज देशात कुपोषणसारखा आजार आहे हजारो मुल शिक्षणापासून वंचित आहेत बालमजुरी करवून घेणारे आहेत.. मेट्रो शहरात आज हरवलेल्या मुलांची संख्या लाखांमध्ये आहे त्यातली 20% मुल फक्त सापडली आहेत..जिल्हा परिषद आणि आणि महापालिकेच्या शाळेची अवस्था खुपच खराब आहे पोषण आहाराची तर भ्रष्टाचारामुळे वाटच लागली आहे अतिशय वाईट खाण मुलांना दिल जातय भ्रष्टाचार कमी झाला कायदे कडक झाले देशाची सुरक्षा वाढली तर ह्याची उत्तर मिळतील मला वाटत..
. आता प्रश्न आहे तो सामान्य आणि उच्च घरातील मुलांचा ह्या मुलांच होत सर्व इच्छेनुसार परंतु काही वेळा घरातील दुर्लक्षपणा, काही भुलवणार्या गोष्टी मुलांना आंधळ बनवतात आणि मुल आहारी जातात प्रमुख गोष्ट व्यसन आत्ताची पिढी frustration आलय किंवा मजा म्हणून व्यसन करते पण ते चुकीच आहे दुसर म्हणजे fast food.. हल्ली status म्हणून Macdonalds KFC मध्ये जातात खुप fast food खातात आणि आता मुलांमध्ये डायबेटिसच प्रमाण जास्त आहे... काहींना वाटत आपण वडिलांना बनवतोय पण आपण बनत असतो आणि समजेपर्यंत वेळ गेलेला असतो...
Thursday, 14 November 2013
बालदिवसाच्या दिवशीच वास्तव
Sunday, 13 October 2013
देव होतोय retired
ध्येय जिद्द परिश्रम चिकाटी ह्याच प्रतिक म्हणजे 'सचिन तेंडुलकर' कोणत्याही मराठी माणसाला किंवा देशाला कौतुक वाटाव असा आमचा सचिन. आज अख्या जगात सर्व बायकांना पुरुषाला सचिन भाऊ असावा तर वृद्धांना सचिनसारखा मुलगा असावा अस वाटत.. 2 वर्षापुर्वी जन्माला आलेल मुल म्हणत मला सचिन व्हायचय सचिन हा वयाच्या 16 व्या वर्षापासून क्रिकेट खेळतोय, माणसाला प्रसिद्धी मिळाली की माणूस हवेत चालतो पण हवेत न चालणार्या माणसातील सचिन.. आज एवढे records करुनही जमिनीवर चालणारा सचिन..
shoaib akhtar,Mcgrath,shane warne,wasim akram यांच्या गोलंदाजीवर बाकीचे फलंदाज नाचताना एका बाजूने भक्कम उभा राहणारा सचिन.. खरेपणाच प्रतिक म्हणजे सचिन.कधीही आउट असल्यास umpireच्या इशार्याकडे न बघता मैदान बाहेर जाण सर्वांना जमत नाही.. सचिन एक चांगला माणूस आहे म्हणून चांगला खेळाडू आहे.. आजच्या तरुण पिढीसाठी inspiration आहे.त्याच वागण चालण बोलण बघितल्यावर हाच तो विक्रमादित्य असेल का अशी शंका येते..
. जेव्हा सचिन 99 वर असतो तेव्हा आपल ह्रद् य काम करायच थांबत जणू आपलाच कोणीतरी नातेवाईक खेळतोय अस वाटत त्याच कारण त्याबद्दलच प्रेम आस्था..
आता हे सगळ संपणार कारण देव retired होतोय.. तरीही सचिनच्या प्रेमामुळे त्याच्यासाठी थोड बोलाव लागत की त्याचे record कोणीही मोडू नयेत... अश्या ह्या सद् गुणी माणसाला सलाम आणि मुजरा... सचिन जरी खूळातून retired झाला असेल तरी मनातुन retired होणार नाही....:-)