Thursday, 14 November 2013

बालदिवसाच्या दिवशीच वास्तव

         आपण आज d.p बदलून बालदिवस साजरा केला पण मनापासून सांगा किती जणांना पटल? आज देशात कुपोषणसारखा आजार आहे हजारो मुल शिक्षणापासून वंचित आहेत बालमजुरी करवून घेणारे आहेत.. मेट्रो शहरात आज हरवलेल्या मुलांची संख्या लाखांमध्ये आहे त्यातली 20% मुल फक्त सापडली आहेत..जिल्हा परिषद आणि आणि महापालिकेच्या शाळेची अवस्था खुपच खराब आहे पोषण आहाराची तर भ्रष्टाचारामुळे वाटच लागली आहे अतिशय वाईट खाण मुलांना दिल जातय भ्रष्टाचार कमी झाला कायदे कडक झाले देशाची सुरक्षा वाढली तर ह्याची उत्तर मिळतील मला वाटत..
.       आता प्रश्न आहे तो सामान्य आणि उच्च घरातील मुलांचा ह्या मुलांच होत सर्व इच्छेनुसार परंतु काही वेळा घरातील दुर्लक्षपणा, काही भुलवणार्या गोष्टी मुलांना आंधळ बनवतात आणि मुल आहारी जातात प्रमुख गोष्ट व्यसन आत्ताची पिढी frustration आलय किंवा मजा म्हणून व्यसन करते पण ते चुकीच आहे दुसर म्हणजे fast food.. हल्ली status म्हणून Macdonalds KFC मध्ये जातात खुप fast food खातात आणि आता मुलांमध्ये डायबेटिसच प्रमाण जास्त आहे... काहींना वाटत आपण वडिलांना बनवतोय पण आपण बनत असतो आणि समजेपर्यंत वेळ गेलेला असतो...

No comments:

Post a Comment