ह्यावेळेस first time 31st गोव्याला करायच ठरल. गोव्याला कोलवा बीच जवळ आमच booking होत तीथे आलो. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. खुप सार bike riding केल खुप सारे बीच बघितले चर्च बघितले. खुप मजा केली. निसर्गाचा आनंद लुटायचा आहे तर नक्की गोव्याला जाव
तिकडे दारु खुप स्वस्त त्यामूळे पिणारे 90% लोक.कबुल आहे काहींना enjoymentसाठी एखाद दिवस थोडीशी लागते. पण अतिरेक झाला की enjoyment आणि संस्कृतीच्या नावाला काळीमा फासणारी काम हे लोक करतात. अशी खुप उदाहरण बघितली एक बाई बियर शॉपमध्ये बसली होती अचानक उठली आणि बांबूवर काय चढली नाचली काय हे बघून तिच्या आजूबाजूच्या पुरषांनी तीचा पुरेपुर फायदा घेतला हे बघून foreignersनेही तोंडात बोट घातली. पुढे 2 couples होते त्यांची 3 मुल होती ते couples ईतक्या घाणेरड्या अवस्थेत रेतीवर झोपले होते की पुढचा बघू शकत नाही आणि ती 8 ते 9 वर्षाची पोर बिचारी 'ए बाबा उठ ए आई उठ' करत होती, कितीतरी बायका तर्राट होऊन ईतक्या विक्षीप्त अवस्थेत बीचवर पडल्या होत्या की बघणार्याने डोळे बंद करावेत, कॉलेजच्या मुलांचा एक group होता त्यांनी तर आपापसात मारामारी सुरु केली डोकी फोडली एकमेकांची. ज्यांना प्यायच आहे त्यांनी संयम बाळगून प्यावी विसरु नये आपण एका संस्कृती असलेल्या देशातून आहोत. ज्या देशांना संस्कृती नाही जे आपली संस्कृती बघायला येतात त्यांनीच आपले हे पराक्रम बघितले तर आपली बाहेर ईज्जत काय राहील? आणि जनाची नाही तर मनाची तरी ठेवा जरा 31st ला रात्री अर्धवट धूंदीत उठायची शुद्ध नाही रेतीत आडवतिडव लोळून काय 31st काय enjoy केल असेल ह्या लोकांनी? काहींना वाटत बायका दारु प्यायला लागल्या आपण नाचलो म्हणजे खुप high class झालो पण अस काही नाही मनाने high class व्हा ते जास्त चांगल असेल
Saturday, 4 January 2014
31st @ Goa
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment