टोल हा विषय काढल्यावर पहिला प्रश्न येतो टोल घेण खरोखरच जरुरी आहे का? आपण रस्त्याचा जो tax भरतो त्यात भागत नाही का? तो पैसा कुठे जातो हे जाणून घेण पहिल जरुरी आहे त्याचा पुरेपुर वापर होतो की नाही आणि जर होतो अस उत्तर असेल तर तो दिसत का नाही? रस्त्यावर जागोजागी खड्डे दिसतात.मुंबईत रस्त्यात खड्डे आहेत की खड्यात रस्ते हा मोठा प्रश्न. मग अश्या स्थितीत maintainanceच्या नावाखाली टोल का भरायचा? रस्ते नीट करा खुशीने टोल भरु.
आणि टोलची रक्कम ठराविक का नसते? जर एखादा रस्ता बांधायला 200 करोड खर्च असेल तर वसूली 25 वर्ष1200 करोड वसूल होई पर्यंत चालते. ती 25 वर्ष संपत आली की पुढची 25 वर्ष त्याच्या repairing च्या नावाने उकळतात म्हणजे एक रस्ता बांधला की ह्या भुक्कड contractorच्या चार पिढ्या आरामात एशआरामात जातात ह्यातून publicला फक्त घाणेरडे सिमेंटचा जास्त वापर केलेले रस्ते मिळतात डांबर वाळू कमी वापरुनही हे निच्चड लोक पैसे खातात. मुंबई पुणे express हायवे आपण बघतोच आज कित्येक अपघात टायर तापल्याने होतात ह्याच कारण सिमेंटच आणि ह्याच contractorना सरकार पुन्हा रस्ते बांधायला देत.म्हैसकर group, IRB, Relience infrastructureवाले जसे काय सरकारचे जावई आहेत. साला जनतेची कोणाला पडलीच नाही आहे सरकार आणि contractor ढेकूण आहेत सामान्य जनतेच रक्त शोषल्या शिवाय थांबत नाहीत
मनात जर ईच्छा असेल तर लोन काढूनही एकदाच पैसे देऊन रस्ते बांधता येऊ शकतात जर 200 करोडचा रस्ता असेल तर साधारण 600 करोड पर्यंत व्याजासकट रक्कम जाईल मग टोलचा हट्ट का? किती म्हणून पैसा खाणार हे राजकारणी? दिवसेंदिवस गाड्यांची संख्याही वाढतेय मग उत्पन्न वाढत नसेल का? आणि टोलसाठी electric pole का नाही वापरत मग? सगळ्याचा व्यवस्थित हिशोब भेटेल आणि पैसे खायला भेटणार नाही म्हणून?
एक माणूस election आल की सतत स्वतःला अटक करण्याच्या भानगडीत पडतो त्याला लोकांच्या सेवेपेक्षा TRPमध्ये intrest असत.'राज'कारण करणे बस एवढच माहीत. अशी माणस election नंतर गप्प होतात त्यांना तोपर्यंत हफ्ता पण भेटतो आपल आहे तेच चालू राहत. मागच्या निवडणूकीत भैये भेटले नंतर महानगरपालिकेच्या निवडणूकीत मराठी पाट्या भेटल्या आणि आता टोल..सर जनता काही मुर्ख नाहीत दर वेळेस भावनीक होऊन vote करेल.मांडलेले मुद्दे बरोबर असले तरी ते निवडणुकीनंतर विसरले का जातात? नंतर त्यांच काय होत? की 2 दिवस मुंबई पाडली सगळ झाल? आणि हा टोलचा मुद्दा राजू शेट्टीनी उचलला तेव्हा तुम्ही कुठे होतात? की तुमची tube फक्त election च्या महिनाभर आधी पेटते? शेवटी एवढच सांगावस वाटत की जनता आता मुर्ख राहिली नाही आहे काम करा आम्ही खुशीने वोट करु. नाहीतर राजकारणी vs. जनता संघर्ष पेटायला वेळ लागणार नाही
Wednesday, 29 January 2014
टोल मधला झोल आणि त्यातल 'राज'कारण
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment