डिजीटल ईंडीया हा विषय सध्या गाजतोय देशात हवा निर्माण होतेय. कधीकधी प्रश्न पडतो डिजीटल भारताची संकल्पना काय..बाहेरच्या मोठ्या कंपन्यांना भारतात आणायच? त्याना भारतात यावच लागेल कारण भारतात marketing तेवढ आहे. सर्वांनी तिरंगे वाले डी.पी लावले म्हणजे झाल का? ऐवढे भारतीय संकुचित विचारांचे आहेत का? ऐखाद्या गोष्टीचा trend झाला की मागचा पुढचा विचार न करता सर्वांनी त्याच अनुकरण करायच.
मला अस वाटत Digital India म्हणजे शाळा e-learning बनवा, भारतीय उद्योजक तयार करा, मोठा भारतीय तरुण वर्ग आहे जो foreignला जातो त्यांच्यासाठी धोरण तयार करा..आज निम्यापेक्षा जास्त गावात internet नाही नी हे काय digital India बनवणार..marketing किंवा गुंतवणूक म्हणजे digital India नव्हे.देशात मोठ्या कंपन्या येण जमेची बाजू आहे पण आपल्या देशात innovationला किती demand आहे? Government शाळांची हे परिस्थिती सुधरवू शकत नाहीत काय हे digital India बनवणार.. विद्यार्थ्याने प्रश्न विचारले पाहीजेत पण त्यांच्याकडूनच नको त्या उत्तरांच पाठांतर करुन घेतो..Engineeringचे जुनाट concept अजून पोर शिकत आहेत. कशी पोर techie होणार? कशी grasping power वाढणार?
सत्या नदेला, सुंदर पिचाई बाहेरच्या देशात जाऊन मोठ्या कंपनीचे CEO वैगरे झाले त्यात त्यांच प्रचंड मेहनत, काम आहेच पण त्यांचा आपल्या देशासाठी उपयोग काय? असेच सुंदर पिचाई दुसर्या देशात जाणार असतील आणि त्यांच्या कंपन्या आपल्याकडे आल्यावर आपण आपल्या देशाला digital India म्हणवणार असू तर आपण zero आहोत. Infosys, L&Tमध्ये maximum भारतीय काम करतात ह्याचा अभिमान असतो पण आपण गुलाम आहोत परकीय लोकांच्या managementवर नाचणारे. सोमवार ते शुक्रवार कुत्र्यासारख काम करणार (अस माझ्या ऐकण्यात आहे की Indian लोक बाकीच्यांपेक्षा जास्त काम कमी पैशात करतात आणि बुद्धिमत्ता पण ठासून आहे म्हणून त्यांना पसंती आहे), शनिवार रविवार कुठेतरी पबमध्ये जाऊन नाचणार , इंग्लिशमध्ये अगदी हाय फाय बोलणार, ऐखादी गाडी, मुंबईत 2BHK flat, सुंदर बायको मिळाली की दुनिया गेली तेल लावत..मित्रांनो तुमच्याकडे capability आहे skill आहे, hard working करता तर देशासाठी का नाही? का आपल्याला USला जाण मोठेपणाच वाटत? छोड़ दो यार ये country ये देश का कुछ नही हो सकता सब corrupted अस बोलून काहीच होत नाही. सामान्य वर्ग नोकरी छोकरीत अडकलाय त्यांना त्यातून बाहेर काढायला सरकारने कमी व्याजात कर्ज वैगरे योजना उद्योगांसाठी करायला हव्यात.
चांगले उद्योजक तयार व्हायला हवेत, innovationवर भर दिला गेला पाहीजे. आपण सर्व थुंकलो तरी ईंग्लंड or अमेरीका वाहून जाईल अस आपण म्हणतो मग हेच देश आपल्यापुढे कसे? आपण उड्या मारायला शिकल पाहीजे.. स्टिव्ह जॉब्स, मार्क झुकर्सबर्ग हे तर drop out होते त्यांना Apple आणि Facebook बनवता आल तर आपल्याकडे IITचे topper बसलेत त्यांना का नाही शक्य होणार मला Facebookमध्ये जॉब मिळेल हा विचार न करता मला Facebookसारख काय बनवता येईल हा विचार महत्वाचा वाटतो.
So hope so खर्या अर्थाने आपण digital होवू😃
No comments:
Post a Comment