Sunday, 15 May 2016

Private शाळा vs जिल्हा परिषद शाळा

      पोरग रेंगायला लागल ना लागल तिथपासून पालकांना वेड लागत ते त्याच्या भविष्याच काय बनणार काय करणार वैगरे वैगरे.. सुरवात होते ती त्याच्या play groupपासून ३ वर्षाच्या मुलाला पोराला गाणी काय म्हणायला लावतात.. A,B,C,D काय बोलायला लावतात..उदाहरण द्यायच झाल तर मागे ऐकदा कोकणात जात होतो traffic जाम झाल होत driverने गाडी बंद केली अर्थात ऐसी बंद झाला पुढच पोरग किरकिर करत रडत उठल त्याला शांत करायला माझी आई अजून काही बायका पुढे गेल्या ते पोरग शांत झाल्यावर बायकांची चांगली गट्टी जमली मग रात्री ३ वाजता त्या पोराच्या आईने त्याच्याकडून A,B,C,D twinkle twinkle little star हे सर्व बोलून घेतल..बायकांच कौतुक ऐकून त्याच्या आईला छान वाटत होत पण त्या मुलाची काय गोची होत होती ते बघून मला त्याची द् या येत होती. काही पालक भयानक आहेत पोरांना खेळणी educational कारने खेळायच नाही.२ वर्षापासून जर्मन, फ़्रेंच language शिकवायला लागलेले पालकही मी पाहीलेत. 
        नंतर सुरवात होते ती शाळेत जायची त्याच्या admissionची त्यातही आता brands आलेत अगदी सर्व नेत्यांपासून ते माणिकचंद वैगरे गुटखावाल्यांनी शाळा टाकल्या आहेत ऐकदम हाय फाय.. पहिलीची फी ऐक लाख रुपये shoes reebok Nikeचे वापरायचे ते पण सांगितलेल्या दुकानातून घ्यायचे.. खेळायला वेगळा पळायला वेगळा पोहायला वेगळा craftला वेगळा असे वेगवेगळे कपडे त्याचा वेगळा खर्च..ऐवढ्याशा पोराचा महिन्याचा खर्च दोन लाख रुपये अश्या शाळेत आपल पोरग गेल की आईबापाची कॉलर ताठ होते.. पण अश्या शाळांमध्ये शिष्टाचार नावाची गोष्ट किंवा संस्कृती कुठपर्यंत शिकवलत जाते? अख्खा दिवस ती पोर शाळेत असतात बाहेरच knowledge शून्य साध ट्रेनमध्ये चढता येत नाही.. पोरांना rough tough करायच सोडून नाजूक साजूक बनवतात.. मध्ये ऐका शाळेबद्दल ऐकल की म्हणे ५वी ची ट्रीप Switzerlandला compulsory जात आहे. ह्या पोरांचे आईबाप दिवसरात्र पैश्याच्या मागे असतात पोरांकडे लक्ष राहत नाही आणि बिघडूही शकतात 
            ऐवढ सर्व यासाठीच लिहावस वाटल उगाच आपल्या सारख्या उच्चमध्यमवर्ग किंवा मध्यमवर्गाचा लोकांना कायम ह्याच attraction असत पोरग English फडफड बोलाव सर्व activities मिळाव्यात पण शिक्षण म्हणजे धंदा झालाय पालकांना attract करुन लुटायच.. मुलात talent असेल तर कसही वर येत.. नेते जिल्हा परिषद मुन्सिपाल्टीच्या शाळा सुधरवायला जात नाहीत त्या सुधरवल्या तर ह्यांचे धंदे बंद होतील.. मुलाचा पाया हा शाळा असते शाळा ही देशाला चांगला नागरीक देण्यासाठी महत्वाची असते..आज किती नेत्यांची पोर जिल्हा परिषदेत शिकली आहेत? आपल्याला लाज वाटली पाहीजे आपल्या सरकारी शाळेंची परिस्थिती बघून.. आज ZPशाळा नीट केल्या तर कोण कशाला private शाळात जाईल? कृपया त्याही शाळा सुधरवा गरीबाची असली तरी आपलीच पोर आहेत त्यांना साधी प्रयोगशाळाही माहीत नाही.. आता Make in Indiaच्या नावाखाली डिजीटल स्कूल देखील होवून जावू देत

No comments:

Post a Comment