Sunday, 6 July 2014

मुंबई आणि मुंबईकर

   मराठी माझी मायबोली लोकांनी परदेशी नेली सार्यांनी दिला तीला मान अवघ्या महाराष्ट्राची शान संस्कृतीचा मेळ भरतो नाही जीथे दुजाभाव बनतो भाषांचा इंद्रधनू अस माझ गिरगाव
           हे गाण आज अचानक play listला लागल आणि blog लिहावासा वाटला..मुंबईकर म्हटल की गिरगाव,परेल,लालबाग,दादर हे भाग लक्षात येतात जीथे खुप सार्या कापड गिरण्या होत्या तीथे आपला सामान्य मध्यम वर्गीय मराठी माणूस स्थायिक झाला, मोठा झाला.
           मनाने साधा, स्वच्छ मनाचा, पण तेवढाच कणखर एक मारली तर दोन ठेवून देणारा मराठी माणूस, तेवढाच संस्कृतीचा अभिमान, गर्व असलेला हा मराठी माणूस खिश्यात दमडी नसू दे पण सण साजरा करणारच..सांगायला अतिशय आनंद होतो मुंबईतले साजरे होणारे उत्सव बघायला लोक परदेशाहून येतात. गणपती, दहीहंडी, गुढीपाडवा हे सण साजरा करण्यात गिरगाव,परेल,लालबाग,दादरकरांचा हातच कोण धरु शकत नाही. एवढ ऐक्य एवढा जोश अस सगळ्याच जबरदस्त combination मुंबईकरात आहे. आज जरी सगळीकडे बोंब आहे मराठी माणूस मुंबईत खुप कमी दिसतोय तरीही आज तेवढ्याच जोमाने गुढीपाडव्याची प्रभात फेरी निघते, तेवढ्याच जोशात बाप्पा येतात.पण सत्य परिस्थिती मुंबईतली लोक ठाणे, डोंबिवलीत जात आहेत अशी असली तरीही तिकडेही हे ऊत्सव जोशात सुरु आहेत. त्यासाठी मुंबईकराला सलाम
            आज गिरगाव,परेल,लालबाग,दादर भागात मोठे मोठे tower ऊभे राहत आहेत किंमत चार करोड, पाच करोड पण एक मात्र नक्की आहे तीथे राहणारा माणूस पैशासाठी जगतोय आणि सामान्य 10X10च्या खोलीत राहणारा माणूस माणूसकी साठी जगतोय ह्याचा खरच आम्हाला अभिमान आहे. रात्री अपरात्री कोणीही आजारी पडू दे कोणावरही प्रसंग येवू दे अख्खी चाळ जागी असते तस कुठल्याच buildingमध्ये नाही दिसणार, आणि मराठी माणसाकडे पैसे नसले तरी प्रामाणिकपणा कधीच सोडणार नाही.
           पुढे बाहेरच्या राज्यातून धनाढ्य लोक मुंबईत आले. मुंबईत त्यांचा व्यापार तेजीत चालू लागला. त्याचे मोठे offices, malls, high class buildings उभ्या राहिल्या पैसा गिरण्या चालवण्यात नाही buildings बांधण्यात आहे हे लक्षात आल आणि मुंबईतल्या गिरण्या बंद पडल्या.बहुतेक मुंबईकर हा कामगार वर्गातला मुंबईतल्या गिरण्या बंद पडल्या खिश्यात पैसा नाही त्यामूळे जागा विकून बहुतेक मुंबईकर गावात गेले, काही ठाणे,डोंबिवली,कल्याण,बदलापूर अश्या ठिकाणी गेले. हळूहळू मुंबईकरांना मुंबई न परवडणारी झाली त्यांच्या चाळींच्या मोठ्या buildings झाल मुंबईकराला maintenance परवडणारा नव्हता so जागा विकून बाहेरगावी गेले. पण जेवढे शिल्लक आहेत ते ही संस्कृती जपत आहेत.
             मुंबईत अनेक परप्रांतीय आले आपले धंदे बसवले मुंबईकराने त्यांनाही सांभाळल त्यांनाही मोठ केल. तेही आदराने बोलतात 'मुंबई में जाओगे तो भूखा नही सोओगे' मुंबई कष्ट करणार्याची आहे. कष्ट केलात तर पैसा आहे. सेकंदावर धावणारा मुंबईकर ट्रेनमध्ये चौथी सीट भेटली तरी खुश होतो. अश्या मुंबईकराला सलाम..:-)

Wednesday, 11 June 2014

दिल्ली है tourist को लुटने वालों की..

             दिल्ली है दिलवालों की अस बोलण्याऐवजी दिल्ली है tourist को लुटनेवालोंकी अस बोलावस वाटतय..तीथल infrastructure आणि रस्ते चांगले आहे no doubt रस्ते तर जबरदस्तच आहेत.पण आमच्याबरोबर जी वागणूक झाली जो experience होता तो खुपच worst होता. राजधानी ह्या शब्दाला काळीमा फासणारा होता.
            दिल्लीत रात्री २ वाजता Airportला पोहचलो. मुंबईला यायची टिकीट ट्रेनची होती so हॉटेल New Delhi स्टेशनजवळ book करायच ठरल. So airportवरुन New Delhi स्टेशनला जाणारी Delhi corporationची बस पकडली. conductorने १५₹ च तिकीट फाडल आणि बोलतो १५०₹ दो. आम्ही बोललो १५०₹ क्यों तिकीट तो १५₹ का निकाला है त्यावर बोलतो चुपचाप से दे बाकी लोग दे रहे है ना? दुसर राज्य काही बोलू पण नाही शकत गप पणे द्यावे लागले. हा आलेला पहिला अनुभव.
            दुसरा अनुभव: बसमधून दिल्ली स्टेशनला उतरलो तिथे वाटल autoवाला चांगला भेटेल चांगल्या हॉटेलला सोडेल त्याने एका हॉटेलला सकाळी ४ला सोडल त्याचे २४तासाप्रमाणे १८००₹ ठरले. ३ तास आराम केला आणि सकाळी ७ला दिल्ली दर्शनला निघालो दिल्ली दर्शन खुप मस्त झाल भुरटे लोकपण भेटले पण मजा आली. रात्री ८ला हॉटेलला पोहचलो तर हॉटेलवाला बोलतो आपको अब double pay करना होगा हा दुसरा झटका होता का विचारल तर बोलतो १२ noon to १२ noon check in and check out है. अस काही बोलला पण नव्हता लिहिल पण नव्हत. तरीही बोललो ठीक आहे we will pay..सकाळी पैसे द्यायला गेलो तर बोलता including all taxes आपको 4851 भरना पडेगा त्याने माझ्याकडून २४ तासाचे 4851 rupees घेतले. आणि आदल्या दिवशी नेपाळी मुली दिसल्या होत्या वाटल tourist असतील पण जाताना पटल आपण Red light areaमध्ये अडकलोय.
               तिसरा अनुभव: आमची मुंबईची ट्रेन हजरत निजामुद्दीन railway स्टेशनवरुन होती म्हणून new delhi stationवरुन तिकडे जाणारी Delhi Corporationची बस पकडली त्यातल्या conductorला तिकीट द्यायला बोललो तर त्याने उतरणार्याच तिकीट दिल आणि तेच वापरायला सांगितल आणि ३० रुपये फुकटमध्ये खाल्ले. मुंबईत असला असता तर पक्का थोबडवला असता त्याला.
                आणि अजून डोळ्याने बघितलेले प्रकार म्हणजे Railway च black मध्ये booking अजून चालत तीथे.स्टेशनला फिरत असतात.भाई ब्लॅक में confirm rail ticket चाहिये क्या. लोकांचे विचारच भुरटे सरळ काही करुच शकत नाहीत ते. सरळ पत्ता नाही सांगत ते लोक. तिकडचे दळभद्री traffic पोलिस sandal घालून duty करतात वर्दीचा अभिमान नाही शिस्त हा प्रकारच नाही सगळ corrupted आहेत. पाण्याची बाटली घेतली की तीन वेळा आठवण केल्यावर खुन्नसने बघून 50 मधले 30 परत देणार म्हणजे पैसे परत द्यायची वृत्तीच नाही.
                 अश्या ठिकाणाला कोण आपली राजधानी म्हणेल? हे लोक आपल्या देशातल्याच लोकांना एवढे फसवतात तर foreignersच काय होत असेल? मी कोणत्याही राज्यात एवढी भुरटेगीरी बघितली नाही अट्टल चोर हा शब्द कमी पडेल.
                 दिल्लीमध्ये चांगले लोक आहेत पण त्यांचा टक्का कमी वाटतो. तीथे दोनच प्रकारचे लोक दिसले एकतर एकदम श्रीमंत आणि दुसरे भिकारचोत दलिंदर,middle class हा नाहीच आहे तीथे.. so कोण दिल्लीला जात असेल तर जाण्याआधीचा सल्ला पर्स पाकिट जपून ठेवा आधीच online चांगल्या five star hotelच booking करुन ठेवा भुरट्यांपासून सावध रहा मुद्दा असा दिल्लीत जातायच का? काहीच नाही आहे तीथे direct अमृतसर चंदीगढ गाठा enjoy करा चांगल्यांपेक्षा येडझव्यांनी भरली आहे दिल्ली

Saturday, 8 March 2014

स्त्री

         आज महिला दिन म्हणून थोड स्त्री ह्या विषयावर लिहायची ईच्छा झाली. स्त्री ही एक शक्ती आहे.आजची स्त्री आपल्याला सगळ्या क्षेत्रात पुढे दिसते पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करते. अगदी क्रिडा,राजकारण,पायलट, मोटरमन, IPS,IAS अधिकारी ह्यात आधी पुरुषांच राज्य होत पण ह्या सर्व गोष्टी स्त्रीया आता सहज करु लागल्या. स्त्रीयांना ५०% आरक्षण मिळू लागल. पण ह्या देशात ४ पद्धतीची लोकं राहतात.
          ह्यात महिलांना स्वातंत्र्य देणारे, सनातन पुरोगामी विचारांचे,बायका म्हणजे चूल मुल ह्या विचारांचे आणि स्त्री म्हणजे लैंगिक दृष्ट्या आकर्षण असणारे आहेत.मुख्य म्हणजे सनातन पुरोगामी विचारांचे लोक अजूनही ह्या देशात आहेत याच दुःख आहे मुख्य म्हणजे गरीब श्रीमंत अडाणी शिकलेले सर्वच गटात त्यांचा सामावेश आहे. हे लोक स्त्रीयांचा खुप छळ करतात मुलगाच झाला पाहिजे अशी अट. मुलगा म्हणजे वंशाचा दिवा पुढे जाऊन खानदान चालवणार आणि स्त्री म्हणजे फक्त आणि फक्त खर्च ह्या विचारांचे लोक आहेत. त्यामूळे स्त्री भ्रूण हत्येचे प्रमाण अलिकडे खुप वाढले होते. अभ्रक मारण हा प्रकार कधी कधी स्त्रीच्या विचारा विरुद्ध होत तर कधी तीच्या संमतीने..किती अन्याय आहे त्या चिमुकल्या छोट्याश्या जीवावर ते काही बोलू शकत नाही विरोध करु शकत नाही अश्या निष्पाप जीवांना मारुन टाकायच.बर मारणार्या डॉक्टरांनाही त्याच काही वाटत नाही अक्षरशः हे डॉक्टर कुत्रे पाळता अभ्रक मारायला पुरावे नष्ट करायला पैसे मिळतात डॉक्टर खुश..गरज आहे कडक कायद्यांची..आजची स्त्रीही नोकरी करुन पैसे मिळवू शकते आणि आणि घरच्यांचा सांभाळही करु शकते मग मुलाचा आग्रह का? उलट काही मुलच आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकत आहेत.. so विचार बदला आता मुलगा म्हणजे सर्वस्व अस नाही.
             स्त्री म्हणजे चुल आणि मुल असा विचार करणारेही आहेत पण सध्या परिस्थिती बदलली पाहिजे किंवा बदलते आहे मुलगी शिकली प्रगती झाली हा नुसता नाराच न राहता मुलींना शिक्षण मिळण्याच प्रमाण वाढल आहे मुलगी शिकवून काय करणार? ती तर सासरी जाणार हे विचार बदलले गेले पाहिजेत. आज कितीतरी स्त्रीयांमुळे देशाच नाव पुढे आहे. मुलींची कष्टाळू मनापासून काम करण्याची वृत्ती जास्त वृत्ती जास्त असते मुलांपेक्षा.. आजपर्यंत दहावी बारावीच्या परिक्षेत जास्त गुण मिळवणार्या ही मुलीच आहेत so मुलींना शिकवण खुप गरजेच आहे.
             आजकाल आपण बातम्यांमध्ये पेपरमध्ये सतत एकतो वाचतो ५ वर्षाच्या मुलीवर बलात्कार ९३ वर्षाच्या बाईवर बलात्कार हे सगळ का होतय कश्यामुळे होतय? ह्यात त्या निष्पाप स्त्रियांची काय चुक? का आपल्या देशात स्त्रिया सुरक्षित का राहु शकत नाहीत? गरज आहे पुरुषांनी स्त्रीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलण्याचा आणि शरीरातील वासना कमी करण्याचा.. आणि तरीही जर असं कृत्य होत राहिली तर गरज आहे कडक कायदे करण्याची.. आज एखाद्या स्त्रीवर acid फेकल जात १० वर्षात acid फेकणारा तरुण तुरुंगातुन बाहेर येतो पण आयुष्यभरासाठी त्या मुलीचा चेहरा विदृप होऊन जातो.. मग गुन्हा कोणाचा शिक्षा कोणाला? परवा सत्यमेव जयतेमध्ये सांगितल त्यानुसार अजुन १,०१,०४१ बलात्काराचे गुन्ह्यांची सुनावणी होण बाकी आहे गुन्हेगार बिंधास्त आहे मग का असे गुन्हे परत होणार नाहीत गरज आहे हे खटले fastrackमध्ये काढायची लोकांनी जाग होऊन आंदोलन करायची.निर्भया बलात्काराच्या वेळी सगळ्यांनी निदर्शन केली होती facebook twitterवर काळे ठिपके लावून निंदा केली मेणबत्या जाळल्या मग नंतर काय? त्याने बलात्कार थांबले? गरज आहे कायद्यात सशक्त बदल होण्याची आणि ते झाल तरच महिलांची सुरक्षा व्यवस्थित होण्यास मदत होवू शकते.. आज महिला दिवस आहे hope अस काहीतरी चांगल होईल.
   महिला दिनाच्या दिवशी वाचलेली चांगली लाईन आठवली..
      यात्र नार्यस्तू पुज्यंते रमते तत्र देवता

Wednesday, 29 January 2014

टोल मधला झोल आणि त्यातल 'राज'कारण

        टोल हा विषय काढल्यावर पहिला प्रश्न येतो टोल घेण खरोखरच जरुरी आहे का? आपण रस्त्याचा जो tax भरतो त्यात भागत नाही का? तो पैसा कुठे जातो हे जाणून घेण पहिल जरुरी आहे त्याचा पुरेपुर वापर होतो की नाही आणि जर होतो अस उत्तर असेल तर तो दिसत का नाही? रस्त्यावर जागोजागी खड्डे दिसतात.मुंबईत रस्त्यात खड्डे आहेत की खड्यात रस्ते हा मोठा प्रश्न. मग अश्या स्थितीत maintainanceच्या नावाखाली टोल का भरायचा? रस्ते नीट करा खुशीने टोल भरु.
          आणि टोलची रक्कम ठराविक का नसते? जर एखादा रस्ता बांधायला 200 करोड खर्च असेल तर वसूली 25 वर्ष1200 करोड वसूल होई पर्यंत चालते. ती 25 वर्ष संपत आली की पुढची 25 वर्ष त्याच्या repairing च्या नावाने उकळतात म्हणजे एक रस्ता बांधला की ह्या भुक्कड contractorच्या चार पिढ्या आरामात एशआरामात जातात ह्यातून publicला फक्त घाणेरडे सिमेंटचा जास्त वापर केलेले रस्ते मिळतात डांबर वाळू कमी वापरुनही हे निच्चड लोक पैसे खातात. मुंबई पुणे express हायवे आपण बघतोच आज कित्येक अपघात टायर तापल्याने होतात ह्याच कारण सिमेंटच आणि ह्याच contractorना सरकार पुन्हा रस्ते बांधायला देत.म्हैसकर group, IRB, Relience infrastructureवाले जसे काय सरकारचे जावई आहेत. साला जनतेची कोणाला पडलीच नाही आहे सरकार आणि contractor ढेकूण आहेत सामान्य जनतेच रक्त शोषल्या शिवाय थांबत नाहीत
             मनात जर ईच्छा असेल तर लोन काढूनही एकदाच पैसे देऊन रस्ते बांधता येऊ शकतात जर 200 करोडचा रस्ता असेल तर साधारण 600 करोड पर्यंत व्याजासकट रक्कम जाईल मग टोलचा हट्ट का? किती म्हणून पैसा खाणार हे राजकारणी? दिवसेंदिवस गाड्यांची संख्याही वाढतेय मग उत्पन्न वाढत नसेल का? आणि टोलसाठी electric pole का नाही वापरत मग? सगळ्याचा व्यवस्थित हिशोब भेटेल आणि पैसे खायला भेटणार नाही म्हणून?
               एक माणूस election आल की सतत स्वतःला अटक करण्याच्या भानगडीत पडतो त्याला लोकांच्या सेवेपेक्षा TRPमध्ये intrest असत.'राज'कारण करणे बस एवढच माहीत. अशी माणस election नंतर गप्प होतात त्यांना तोपर्यंत हफ्ता पण भेटतो आपल आहे तेच चालू राहत. मागच्या निवडणूकीत भैये भेटले नंतर महानगरपालिकेच्या निवडणूकीत मराठी पाट्या भेटल्या आणि आता टोल..सर जनता काही मुर्ख नाहीत दर वेळेस भावनीक होऊन vote करेल.मांडलेले मुद्दे बरोबर असले तरी ते निवडणुकीनंतर विसरले का जातात? नंतर त्यांच काय होत? की 2 दिवस मुंबई पाडली सगळ झाल? आणि हा टोलचा मुद्दा राजू शेट्टीनी उचलला तेव्हा तुम्ही कुठे होतात? की तुमची tube फक्त election च्या महिनाभर आधी पेटते? शेवटी एवढच सांगावस वाटत की जनता आता मुर्ख राहिली नाही आहे काम करा आम्ही खुशीने वोट करु. नाहीतर राजकारणी vs. जनता संघर्ष पेटायला वेळ लागणार नाही

Saturday, 4 January 2014

31st @ Goa

               ह्यावेळेस first time 31st गोव्याला करायच ठरल. गोव्याला कोलवा बीच जवळ आमच booking होत तीथे आलो. निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. खुप सार bike riding केल खुप सारे बीच बघितले चर्च बघितले. खुप मजा केली. निसर्गाचा आनंद लुटायचा आहे तर नक्की गोव्याला जाव
              तिकडे दारु खुप स्वस्त त्यामूळे पिणारे 90% लोक.कबुल आहे काहींना enjoymentसाठी एखाद दिवस थोडीशी लागते. पण अतिरेक झाला की enjoyment आणि संस्कृतीच्या नावाला काळीमा फासणारी काम हे लोक करतात. अशी खुप उदाहरण बघितली एक बाई बियर शॉपमध्ये बसली होती अचानक उठली आणि बांबूवर काय चढली नाचली काय हे बघून तिच्या आजूबाजूच्या पुरषांनी तीचा पुरेपुर फायदा घेतला हे बघून foreignersनेही तोंडात बोट घातली. पुढे 2 couples होते त्यांची 3 मुल होती ते couples ईतक्या घाणेरड्या अवस्थेत रेतीवर झोपले होते की पुढचा बघू शकत नाही आणि ती 8 ते 9 वर्षाची पोर बिचारी 'ए बाबा उठ ए आई उठ' करत होती, कितीतरी बायका तर्राट होऊन ईतक्या विक्षीप्त अवस्थेत बीचवर पडल्या होत्या की बघणार्याने डोळे बंद करावेत, कॉलेजच्या मुलांचा एक group होता त्यांनी तर आपापसात मारामारी सुरु केली डोकी फोडली एकमेकांची. ज्यांना प्यायच आहे त्यांनी संयम बाळगून प्यावी विसरु नये आपण एका संस्कृती असलेल्या देशातून आहोत. ज्या देशांना संस्कृती नाही जे आपली संस्कृती बघायला येतात त्यांनीच आपले हे पराक्रम बघितले तर आपली बाहेर ईज्जत काय राहील? आणि जनाची नाही तर मनाची तरी ठेवा जरा 31st ला रात्री अर्धवट धूंदीत उठायची शुद्ध नाही रेतीत आडवतिडव लोळून काय 31st काय enjoy केल असेल ह्या लोकांनी? काहींना वाटत बायका दारु प्यायला लागल्या आपण नाचलो म्हणजे खुप high class झालो पण अस काही नाही मनाने high class व्हा ते जास्त चांगल असेल